“विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा-बसवराज पाटील!
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा : गेली 2009,2014 ,2019 पर्यंत झालेल्या विधानसभा असो अथवा कारखाना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकापर्यंत स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून कामं केली असून जनता आम्हाला चांगली ओळखून आहे .येणाऱ्या ७ तारखेला तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदान रुपी आशीर्वाद देऊन भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन भोसे जिल्हा परिषदेचे उमेदवार बसवराज पाटील यांनी माचणूर येथे प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, विठ्ठलचे माजी चेअरमन भगिरथ दादा भालके , उमेदवार कोमल ताई ढोबळे, महावीर ठेंगील,यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समिती मधील सर्व उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाले भोसे गटात मला विरोध करायचा म्हणून बाहेरचा उमेदवार आणून उभा केला विरोधक म्हणाले स्वर्गिय भारत नानाचा फोटो काढून निवडणूक लढवा पाच हजार मते मिळतील असे विरोधक म्हणतात स्वर्गिय आ.भारत नाना पासून ते भगीरथ दादा भालके यांच्या सोबत १७ वर्षे काम केली आहेत. त्या गटात स्थानिक अनेक उमेदवार असताना विरोधकांनी केवळ मला विरोध करायचा म्हणून दुसऱ्या गटातील आर्थिक गडगंज असलेला उमेदवार देऊन उभा केला आहे.
भोसे जिल्हा परिषद गटात १६ ते १७ गावे आहेत माझा या भागात मतदारांशी रोजचा संपर्क असून आपल्या विरोधात समोर एकही उमेदवार उभे राहू नयेत म्हणून विरोधकांनी प्रयत्न केले ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची लढाई आहे पुढील काळात अनेक आरोप प्रत्यारोप होणार आहेत मतदारांनी कुठल्याही भूलथापांना बळी न पडता तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन पाटील यांनी बोलताना केले.