Uncategorized

भीषण अपघात! मंगळवेढा नजीक पंढरपुरला देवदर्शनासाठी आलेल्या वाहनाचा भीषण अपघात, अपघातात चौघांचा जागीच मृत्यू 

भीषण अपघात! मंगळवेढा नजीक पंढरपुरला देवदर्शनासाठी आलेल्या वाहनाचा भीषण अपघात, अपघातात चौघांचा जागीच मृत्यू

 मंगळवेढा शहराजवळ अपघात होऊन चाैघांचा जागीच मृत्यू तर  अनेक लहान मुलासह गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान वाहन चालक दारूचे सेवण करून वाहन चालवत आसल्याची माहीती समाेर आली आहे.

घटनास्थळी डीवायएसपी डॉक्टर. शिवपुजे ,पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाेरीगीड्डे, घटना स्थळी दाखल झाले आहेत. आयशर टेम्पोचा चालक दारूचे सेवन केलेल्या स्थितीत असल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे,हा अपघात मंगळवेढा -पंढरपूर राेडवरील देगांव येथे घडला आहे.

वाहतुक शाखेच्या पोलिसांनी कालच एका दारू सेवन करून शहरातून आवजड़ वाहन घेऊन जाणाऱ्या चालकावर कारवाई करून 24 तास उलटन्याच्या आतच चालकाने दारूचे सेवन करून पुन्हा अपघात केल्याने चाैघांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे .

त्यामध्ये एक बालक ही गंभीर जखमी झाले असल्याची वृत्त आहे. बाहेरील कुटूंबिय पंढरपुरला देवदर्शनासाठी आले हाेते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button