Uncategorized

मोठी बातमी! दुहेरी हत्याकांडाने मंगळवेढा तालुका हादरला, शेत जमिनीच्या वादातून दोघांची निर्घृण हत्या

मंगळवेढा प्रतिनिधी 

मंगळवेढा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शेत जमीन प्रकरणाच्या वादातून दोन व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे.रीना आप्पा ढोबळे (वय 35 रा.गुंजेगाव) व चंद्रकांत तात्यासाहेब पाटील (वय 46 रा.राजापूर ता.सांगोला असे हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत.ही घटना आज सकाळी 9 च्या सुमारास गुंजेगाव-लक्ष्मी दहिवडी रोडवरील ढोबळे वस्ती येथे घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत रीना ढोबळे यांची जमिन गुंजेगाव भागात असून या जमिनीवरून काही जणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.या वादातून खून झाले असल्याचे प्राथमिक माहिती मिळत असून हल्लेखोरांनी हातोडा, पाईपच्या साह्याने डोक्याला जबर मारहाण करून जखमी करून खून केला असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजत आहे.

घटनास्थळी पोलीस विभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे, नागेश बनकर आदींनी भेट दिली आहे. या घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.दरम्यान, या मयत दोघांना आणखीन कोणत्या कारणांसाठी हत्या केली आहे का? याचा सखोल तपास पोलीस करत असून आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button