सोलापूर जिल्हा

दुर्दैवी घटना! अंगावर वीज पडून ८ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू

सोलापूर झालेल्या जोरदार वादळी वा-यासह अवकाळी पावसाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मंगळवेढा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यासह परिसरात धुमाकूळ घातला असून अवकाळी पावसात वीज कोसळल्याने लावण्या हनुमंता माशाळे या ८ वर्षीय बालिकेचा अंत झालाची हृदयद्रावक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे.
गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि
उन्हाची तीव्रता अधिक असल्याने कोणत्याही क्षणी अवकाळी पाऊस येण्याची चिन्हे दिसत होती. शनिवारी दुपारनंतर आभाळात ढगांनी प्रचंड गर्दी केल्याने अगदी सायंकाळसारखा अंधार जाणवत होता. त्यातच सुटलेला जोरदार वारा जणू सोसाट्याच्या वाऱ्याचं रौद्ररूप धारण करून वाहू लागला होता. जोरदार वादळ वारे आणि विजांचा कडकडाट अशातच शहरासह अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले.
त्याचवेळी सायंकाळी ०४ वा. च्या सुमारास मुस्ती इथे वीज कोसळून कुमारी लावण्या माशाळे ही आठ वर्षीय बालिका गंभीररीत्या जखमी झाली. तिला उपचारासाठी खाजगी इस्पितळात नेण्यात आले.या घटनेची माहिती मिळताच दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदारांनी रुग्णालयात जाऊन भेट दिली. तत्पूर्वी तिचा अंत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
लावण्या मुंबईतील चेंबूर परिसरात हनुमान मंदिर एफसीआय येथे तिच्या माता पित्यासह वास्तव्यास होती. तिच्या मावशीचे रविवारी २१ एप्रिल रोजी लग्न असल्याने, आजोळी आली होती. ती त्यांच्या घराच्या गच्चीवर ४-६ लेकरांसह खेळत होती. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button