Uncategorized

कारखान्याचे कर्ज १९८ कोटीवरुन १६३ कोटीवर आणले – चेअरमन शिवानंद यशवंत पाटील

चालू वर्षी चार लाख मेट्रिक टनाचे उदिष्ठ; दामाजी साखर कारखान्याची वार्षिक सभा संपन्न

मंगळवेढा प्रतिनिधी 

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची अधिमंडळाची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार २७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाली सभेच्या सुरुवातीला कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.कि.रा. मर्दा तसेच संस्थापक व्हाईस चेअरमन स्व.रतनचंद शहा शेठजी, श्री संत दामाजीपंत यांच्या प्रतिमेचे पूजन कारखान्याचे मार्गदर्शक प्रा.शिवाजीराव काळुंगे, कारखान्याचे माजी चेअरमन अùड.नंदकुमार पवार, माजी व्हा.चेअरमन रामचंद्र वाकडे, चेअरमन श्री शिवानंद पाटील, व्हा.चेअरमन तानाजीभाऊ खरात, उपस्थित संचालक व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

संचालक औदुंबर वाडदेकर यांनी अहवाल सालात व त्यानंतर दिवंगत झालेले कारखान्याचे सभासद, शेतकरी, कामगार, देशातील कलावंत, शास्त्रज्ञ, खेळाडू, साहित्यीक यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहून सभेचे कामकाजास सुरुवात झाली.

 २०२५-२६ चा अहवाल सादर करताना चेअरमन शिवानंद पाटील म्हणाले कि,तालुक्याचे सहकाराचे मंदिर म्हणन स्व.मारवाडी वकील साहेब, स्व.रतनचंद शहा शेठजी यांनी ३८ वर्षापूर्वी या कारखान्याची उभारणी केली. मंगळवेढा तालुक्यात संत दामाजी कारखाना हा एकमेव असा सहकारी साखर कारखाना आहे.या कारखान्याचे माजी चेअरमन प्रा।शिवाजीराव काळुंगे, अùड नंदकुमार पवार, चरणुकाका पाटील, शशिकांत बुगडे यांनी कारखान्याचा कारभार चांगल्या प्रकारे केला आहे. या संचालक मंडळाची आजची ५ वी वार्षीक सभा आहे। हे संचालक मंडळ सत्तेवर आल्यावर कारखान्यावर १९८ कोटी कर्ज व खात्यावर ३ लाख रुपये शिल्लक होते. असे असताना सगळयांच्या सहकार्याने कारखाना व्यवस्थित चालवविला आहे. प्रत्येक वर्षी एफ।आर।पी।पेक्षा जास्त ऊस दर दिलेला आहे। या कारखान्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक, प्रा.शिवाजीराव काळुगे, रामकृष्ण नागणे, राहूल शहा यांनी बँकांच्या माध्यमातून वेळोवेळी आर्थिक सहकार्य केले आहे. तसेच विठठल सह.साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. मंगळवेढा तालुक्यात चर्चेचा विषय होत असलेल्या एन.सी.डी.सीकडून मिळालेल्या ९४ कोटी रुपयाचा विनियोग केलेचा संपुर्ण तपशिल सभेत वाचुन दाखवला. शासनाकडुन मिळालेल्या ९४ कोटी कर्जाव्यतिरिक्त कसलेही कर्ज कारखान्याने घेतलेले नाही। धनश्री पतसंस्थेच्या माध्यमातुन कारखान्याचे आर्थिक व्यवहार पुर्ण करत कामकाज केले आहे. मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळातील थकित शेतकरी पुर्ण बीले, तोडणी वाहतुक ठेकेदारांची पुर्ण बीले, व्यापारी पेमेंट,कर्मचारी फायनल देणी या संचालक मंडळाने कांही प्रमाणात अदा केली आहेत। अनेक बँकांची थकीत कर्जे ओटीएस करुन भरलेली आहेत। मागील संचालक मंडळाचे काळात थकलेली फंडाची रक्कम रुपये ६ कोटी ४१ लाख एक रकमी भरल्याने सेवानिवृत्त कर्मचा-यांना पेन्शनचा लाभ मिळत आहे। मागील चार वर्षात कर्मचारी यांचेकरिता पगार,बोंनस,फायनल,थकित पगार,प्राù।फंड यासाठी ६२ कोटी ९९ लाख ८७ हजार खर्च केला आहे। कारखान्यातील कर्मचा-यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेस पगार हे संचालक मडळ करीत आहे। कामगारांनीही कारखाना चालविण्यास योगदान दिल्याने नोव्हेंबर २०२६ पासुन त्यांना शासनाचे नियमानुसार १० टक्के पगारवाढ देण्यात येणार आहे। मागील चार वर्षात पाऊसकाळ कमी झालेने व स्पर्धेमुळे अपेक्षित गाळप झालेले नाही। तरीही इतर इतर कारखान्याच्या बरोबरीने शेतक-यांना ऊस दर दिलेला आहे। मागील वार्षिक सभेत ठरलेप्रमाणे माजी चेअरमन स्व.चरणुकाका पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा तयार झाला असून येत्या कांही दिवसात कारखाना कार्यस्थळावर सदरचा पुतळा उभारण्यात येणार आहे. येणा-या गळीत हंगामाकरिता आसपासच्या कारखान्याप्रमाणे शेतक-यांना ऊस दर दिला जाणार आहे.चालू वर्षीही पाऊस कमी असलेने हा गळीत हंगाम आव्हानात्मक असणार आहे. तरीही या गळीत हंगामात ४ लाख मे.टनाचे उदिष्ठ ठेवलेले आहे. सर्व सभासद, शेतकरी यांच्या सहकार्याने हे निश्चीतच पार पाडू अशी खात्री आहे. आùफ सिझनमधील सर्व कामे पूर्ण झाली आहेत तसेच ऊस तोडणी यंत्रणाही पुरेसी भरलेली आहे. येणारा गळीत हंगाम यशस्वी करणेसाठी शेतक-यांनी आपला ऊस दामाजी कारखान्यास गळीतास देवून सहकार्य करावे असे शेवटी ते म्हणाले.

वार्षिक सभेच्या अनुषंगाने सभासद श्री।एकनाथ फटे,नारायण माने,दत्तात्रय सलगर, शरद ताम्हणकर,बबन रोकडे,श्रीनिवास नाडगौडा,आप्पासाहेब मोरे यांचेकडून आलेल्या विविध धोरणात्मक सुचना व प्रश्नांना चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी सविस्तर व सर्वसमावेषक असा खुलासा करुन माहिती सांगीतली.

कारखान्याचे प्र।कार्यकारी संचालक श्री रमेश जायभाय यांनी उपस्थितांचे स्वागत करुन विषयपत्रिकेवरील मागील वार्षिक सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, संस्थेच्या कामकाजाविषयी अहवाल स्विकारणे, ताळेबंद व नफा-तोटा पत्रके स्विकारणे, वैधानिक लेखापरिक्षकांचा लेखा पिरक्षण अहवाल, दोष दुरुस्ती अहवाल स्विकारणे व त्यास मान्यता देणे, अंदाजपत्रकापेक्षा कमी-जास्त झालेल्या जमाखर्चास मंजूरी देणे, पुढील आर्थिक वर्षाकरिता तयार केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, सल्लागारांच्या नेमणूका करणे,भंगार माल विक्रीस मान्यता देणे इत्यादी विषयांचे वाचन केले ,त्यास उपस्थित सभासदांनी टाळयांच्या गजरात मंजूरी दिली.

 धनश्री परिवाराचे संस्थापक, मार्गदर्शक प्रा.शिवाजीराव काळुंगे मनोगतामध्ये म्हणाले, गेले चार गळीत हंगाम या संचालक मंडळाने चांगल्या पध्द्तीने पार पाडले आहेत, त्यामुळे हे संचालक मंडळ अभिनंदनास पात्र आहे. या संचालक मंडळाने अतिशय चांगल्या प्रकारे काम करुन कारखान्यावरील कर्जाचा बोजा कमी केला आहे। दुष्काळी परिस्थितीमुळे वरचेवर कारखान्यांचे गाळप कमी होत आहे। अत्यंत कठिण परितिस्थतून कारखानदारी जात आहे। दामाजी कारखाना हा चांगला ऊस दर देणारा कारखाना असा लौकीक या कारखान्याचा आहे. तालुक्यातील सहकारी तत्वावर असणारा हा एकमेव कारखाना आहे. हा गळीत हंगाम आव्हानात्मक असल्याने शेतक-यांनी आपला ऊस दामाजी कारखान्यास गळीतास देवून हा गळीत हंगाम यशस्वी करावा असे शेवटी ते म्हणाले.

सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजीभाऊ खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, अशोक केदार, तानाजी कांबळे, प्रथमेश पाटील, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, यांचेसह शिवाजीराव नागणे, पप्पु स्वामी, काशिनाथ पाटील,भारत पाटील,सचिन खरात,कांतीलाल ताटे,नितीन मेटकरी,विजय बुरकुल,अùड,राहुल घुले, श्री।दत्ता गणपाटील, दत्तात्रय बेदरे,कल्याण डोके,शहाजी उन्हाळे,माणिक पवार,शिवाजीराव घोडके,विकास बेदरे,मारुती शिंदे, राजु बेदरे, बंडु बेदरे, राजु बाबर, मनोज चव्हाण, मनोज ठेंगील, कारखान्याचे खातेप्रमुख ,कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते। या वार्षिक सर्वसाधारण सभेचे सुत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संचालक दिगंबर भाकरे यांनी मानले.राष्ट्रगीताने सभेचे सांगता झाली.

दामाजी कारखाना हा चांगला ऊस दर देणारा तालुक्यातील सहकारी तत्वावर असणारा हा एकमेव कारखाना असुन या संचालक मंडळाने चांगले काम करुन कारखाना काटकसरीने चालविला आहे। हा कारखाना टिकणे गरजेचे आहे। या संचालक मंडळाने आमचे पतसंस्थेकडुन घेतलेली कर्जे वेळेवर परतफेड करण्याचे काम केले आहे.माझा कारखाना या नात्याने या कारखान्यासाठी सढळ हाताने आर्थिक सहकार्य करत आलो असुन येथून पुढील काळातही या कारखान्यासाठी माझे सदैव सहकार्य राहिल. या कारखान्याची निवडणुक जवळ आली असुन दुष्काळी परिस्थीतीत निवडणुक बिनविरोध करण्याचा माझा प्रयत्न राहिल

प्रा.शिवाजीराव काळुंगे मार्गदर्शक- धनश्री परिवार

चौकट-

अत्यंत कठिण परिस्थितीत हे संचालक मंडळ या कारखान्यात सत्तेवर आलेपासुन प्रत्येक वर्षी जवळपास २५ कोटी व्याज भरुन या संचालक मंडळाने मागील संचालक मंडळाचे काळातील कर्ज १९८ वरुन रु.१६२ कोटी पर्यंत कमी करत आणले आहे.या संचालक मंडळाशिवाय इतर कोणीही हा कारखाना चालवू शकत नाही. त्यामुळे हे संचालक मडळ निश्चीतच कौतुकास पात्र आहे. येणा-या निवडणूकीकरिता तालुक्यातील सर्व प्रमुख शेतकऱ्याांना भेटुन निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करणार आहे

नंदकुमार पवार,माजी चेअरमन  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button