Uncategorized
“श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना येथे सुरू असलेले कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ;संचालक मंडळाने घेतला मोठा निर्णय
"तब्बल वीस दिवस कर्मचारी बसले उपोषणाला

मंगळवेढा प्रतिनिधी
श्री. संत दामाजी सहकारी साखर कारखाना लिमिटेड, मंगळवेढा येथील कारखाना कार्यस्थळावर कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनावरून (पेन्शन) सुरू असलेले आंदोलन अखेर यशस्वी चर्चेनंतर मागे घेण्यात आले आहे.
कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत सकारात्मक तडजोड केल्याने या वादावर एकमताने तोडगा निघाला असून, गेले काही दिवस चाललेले हे आंदोलन आता पूर्णपणे थांबले आहे. कारखान्याच्या सेवानिवृत्त आणि निवृत्तीवेतनाबाबत काही प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होते. कारखाना प्रशासनाने यावर तातडीने पावले उचलत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले.
त्यानुसार, चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक मंडळाची आणि कर्मचारी प्रतिनिधींची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही बाजूंनी अत्यंत सलोख्याच्या वातावरणात चर्चा केली. कारखान्याची आर्थिक परिस्थिती आणि कर्मचाऱ्यांचे हित या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत संचालक मंडळाने एकमताने एक ठोस निर्णय घेत प्रशासनाने दाखवलेल्या या सकारात्मक भूमिकेमुळे आणि दिलेल्या ठोस आश्वासनांमुळे कर्मचारी प्रतिनिधींचे समाधान झाले.
कारखान्याचे हित आणि गळीत हंगामाची पूर्वतयारी लक्षात घेता, कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. चेअरमन आणि संचालक मंडळाच्या या समन्वयाच्या भूमिकेचे कारखाना वर्तुळात आणि सभासदांमधून कौतुक होत आहे. या यशस्वी तोडग्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी बांधवांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते.



