Uncategorized

“मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मंगळवेढा कडकडीत बंद

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मंगळवेढा कडकडीत बंद

मंगळवेढा प्रतिनिधी

संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मंगळवेढा शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला.या बंदला शहरातील व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोजदादा जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मंगळवेढ्यात गेल्या काही दिवसांपासून विविध उपक्रम राबविण्यात येत होते. त्याच पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज मंगळवेढा शहर व तालुका यांच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते.

शुक्रवारी सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजारपेठा, दुकाने आणि विविध व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या प्रमुख रस्त्यांवर व बाजारपेठेत शांतता दिसून आली. अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
यापूर्वी दामाजी चौक येथे मराठा समाजाच्या बांधवांची बैठक घेण्यात आली होती. तसेच मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ठिय्या आंदोलन, रास्ता रोको आणि बंद याबाबत समाजबांधवांमध्ये जनजागृती करण्यात आली होती.
या आंदोलनादरम्यान “मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे”, “मनोजदादा जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देत आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यात आला.

मंगळवेढा शहरातील विविध भागांत मराठा समाजाचे कार्यकर्ते, युवक व समाजबांधव बंद यशस्वी करण्यासाठी सक्रिय होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन व पोलिसांकडूनही आवश्यक खबरदारी घेण्यात आली.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला मंगळवेढ्यातील समाजबांधवांनी एकजुटीने पाठिंबा देत शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडली.बंदच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या मागणीला मंगळवेढ्यातून ठोस पाठिंबा देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button