Uncategorized

“प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी च्या जोरावर चि. आदित्य दु:शाशन दुधाळ , कु. तनुजा मच्छिंद्र सूर्यवंशी विद्यार्थ्यांनी मिळवले यश

चेअरमन शिवानंद पाटील यांनी केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

“प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी च्या जोरावर चि. आदित्य दु:शाशन दुधाळ , कु. तनुजा मच्छिंद्र सूर्यवंशी विद्यार्थ्यांनी मिळवले यश
चेअरमन शिवानंद पाटील यांनी केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मंगळवेढा प्रतिनिधी

तळसंगी येथील आदित्य दुधाळ 555 व तनुजा सूर्यवंशी यांनी नीट (NEET) परीक्षेत उज्ज्वल यश मिळवल्याबद्दल श्री. संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंदजी पाटील साहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

नीट’ (NEET) या देशपातळीवरील अत्यंत कठीण परीक्षेत तुम्ही मिळवलेल्या घवघवीत यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशाचे कौतुक चेअरमन साहेबा कडून करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी आणि पुढील प्रवासासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचा वाटा असलेल्या त्यांच्या पालकांचेही यावेळी कौतुक करून सन्मान करण्यात आला.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवून तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे.

कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसताना केवळ जिद्द, चिकाटी आणि कठोर कष्टाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे यश खेचून आणले आहे. विद्यार्थ्यांनी डॉक्टर बनून पुढे समाजातील गरीब आणि गरजू रुग्णांची सेवा करावी, असा संदेश यावेळी देण्यात आला. यावेळी तळसंगी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button