दुःखद बातमी!सरला माहेश्वरी यांचे निधन
मुंबई दूरदर्शनच्या ज्येष्ठ वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
दूरदर्शन हेच देशातील माहितीचे प्रमुख आणि विश्वासार्ह माध्यम असताना सरला माहेश्वरी यांनी आपल्या शांत, संयमी आणि प्रभावी आवाजातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते.बातम्या वाचणारा एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांची ओळख होती.
वृत्तनिवेदन करताना त्यांनी नेहमीच मर्यादा, शिस्त आणि प्रतिष्ठा जपली.स्पष्ट उच्चार, समतोल सादरीकरण आणि वस्तुनिष्ठता या गुणांमुळे त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या सादरीकरणातून व्यावसायिकता आणि विश्वासार्हता प्रकर्षाने जाणवत असे.
त्यांच्या निधनाने दूरदर्शनच्या सुवर्णकाळातील एक महत्त्वाचा अध्याय संपला आहे. विविध क्षेत्रांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.