Uncategorized

अभिनंदन! मंगळवेढा एसटी आगाराकडून संदीप दुधाळ यांचा गौरव ,पंधरा वर्षे विना अपघात अखंड सेवा ,दुधाळ कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव 

अभिनंदन! मंगळवेढा एसटी आगाराकडून संदीप दुधाळ यांचा गौरव ,पंधरा वर्षे विना अपघात अखंड सेवा ,दुधाळ कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव

मंगळवेढा प्रतिनिधी

कर्तव्य, निष्ठा आणि सुरक्षिततेचा सुवर्ण प्रवास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामध्ये कर्तव्यदक्ष चालक म्हणून कार्यरत असलेले बंधू संदीप दुधाळ यांना आज प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर मंगळवेढा डेपोचे माननीय डेपो मॅनेजर संजय भोसले यांच्या शुभहस्ते पंधरा वर्षे सुरक्षित सेवा बजावल्याबद्दल प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले, हा क्षण आमच्या संपूर्ण दुधाळ कुटुंबासाठी शब्दात न मावणारा अभिमानाचा आहे.

संदीप यांनी आजवर १७ वर्षांची अखंड सेवा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला दिली असून, त्यापैकी १५ वर्षे अपघातमुक्त, सुरक्षित आणि जबाबदारीने सेवा देत त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. एस.टी. चालक म्हणजे केवळ वाहन चालवणारा कर्मचारी नाही, तर हजारो प्रवाशांच्या आयुष्याची जबाबदारी आपल्या हातात घेणारा मूक सेवक असतो. ही जबाबदारी संदीप यांनी नेहमीच अत्यंत प्रामाणिकपणे निभावली.

कामाविषयीची तत्परता, सेवेतला प्रामाणिकपणा, नियमांबाबतची शिस्त आणि सर्वसामान्य जनतेची मनापासून सेवा करण्याची नितांत वृत्ती – या गुणांच्या बळावरच हा सन्मान त्यांना प्राप्त झाला आहे. रस्त्यावर धावणारी प्रत्येक बस ही केवळ लोखंडाची नाही, तर प्रवाशांच्या विश्वासाची असते; आणि तो विश्वास जपण्याचे काम संदीप यांनी वर्षानुवर्षे केले आहे.

हा पुरस्कार फक्त एका व्यक्तीचा नाही, तर तो कुटुंबातील संस्कारांचा, परिश्रमांचा आणि मूल्यांचा सन्मान आहे. आज संदीप यांच्याकडे पाहताना केवळ एक एस.टी. चालक नाही, तर जबाबदार नागरिक, कर्तव्यनिष्ठ कर्मचारी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व दिसते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button