कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन
मंगळवेढा तालुक्यातील डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे अल्पशा आजाराने सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फुगारे मोटर्सचे मालक अशोक फुगारे यांच्या त्या मातोश्री होत.