सांगोला
मोठी बातमी! माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांचा सर्व पदांचा राजीनामा
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी राजीनामा दिला आहे. दीपक साळुंखे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे संकेत त्यांच्या निकटवर्तीयांनी दिले.
दीपक साळुंखे सांगोला विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. साळुंखे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते निवडून आले होते.
२०१६ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांनी साळुंखे यांचा पराभव केला होता.
साळुंखे सांगोला सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत़ सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी नुकतेच या कारखान्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. साळुंखे यांच्या निर्णयाने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.