सोलापूर जिल्हा
लढणार ! अभिजीत पाटील विधानसभेला उभारणार ,या पक्षाकडून घेतला उमेदवारी अर्ज
माढा अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी एक अर्ज दाखल झाला आहे. तर १३ जणांनी १७ अर्ज घेतले आहे. अतुल कांतीलाल केदार यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
तर अभिजीत धनंजय पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नावाने अक्षय अशोक खरे यांनी अर्ज घेतला आहे. तसेच जरांगे पाटील समर्थकांकडून देखील अर्ज घेण्यात आले आहेत.
अशोक आजिनाथ केचे व सोमनाथ वसंत पवार यांनी जरांगे पाटील मराठा आरक्षण गट अपक्ष या नावाने अर्ज घेतले आहेत. काँग्रेसकडून जाहीर मनेर यांनी सतीश हरिश्चंद्र लोंढे यांनी आम आदमी पार्टी नावाने अर्ज घेतला आहे.
दिनेश हनुमंत गिड्डे मनसे, मोहसीन शहाजहान शेख बहुजन महापर्टी, तुकाराम बळीराम राऊत बहुजन मुक्ती पार्टी, शहजान पैगंबर शेख भारतीय युवा जन एकता पार्टी, रमेश तानाजी खरे महाराष्ट्र विकास सेना यांनी अर्ज घेतले आहेत.