भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार समाधान महादेव आवताडे हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज 28 ऑक्टोंबर रोजी दुपारी १.३० वाजता युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक तसेच मोजक्या ज्येष्ठ सहकाऱ्यांसमवेत भरणार असल्याची माहिती जनसंपर्क कार्यालय यांच्याकडून देण्यात आली आहे.
विद्यमान आ समाधान आवताडे यांचे सासरे बाळासाहेब श्रीहरी नाडे यांचे परवा निधन झाल्याने आ आवताडे यांचा कोणत्याही प्रकारे शक्तीप्रदर्शन अथवा रॅली न करता साध्या पद्धतीने अर्ज भरण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
आ आवताडे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक विकास कामे मार्गी लागल्याने भारतीय जनता पार्टी व महायुतीने त्यांना या मतदारसंघात दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे नियोजित निवडणूकी साठी ते आपला उमेदवारी अर्ज पंढरपूर येथे संबंधित निवडणूक अधिकारी यांचेकडे सादर करणार आहेत.
त्यामुळे भाजपा व महायुतीच्या सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात तसेच गावात मतदारांशी संपर्क ठेवून आ आवताडे यांच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून देण्याचे आवाहन करण्याच्या अनुषंगाने प्रचार करावा असे जाहीर करण्यात आले आहे.