मंगळवेढा

मंगळवेढा! संत दामाजी साखर कारखान्याकडून दिवाळीसाठी साखर वाटप सुरू ,34 केंद्रावर सकाळी दहा ते पाच या वेळेत ,चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली माहिती

मंगळवेढा प्रतिनिधी

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे वतीने सभासदांसाठी दिवाळी सणानिमित्त सवलतीच्या दराने दिली जाणारी साखर आज 20 ऑक्टोबर पासून 25 ऑक्टोबर पर्यंत वीस रुपये किलो दराने 25 किलो साखर वाटप केली जाणार आहे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत ही साखर वाटप केली जाणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी सांगितले.
 कारखान्याच्या सभासदांना साखर विक्री केंद्रावर आपले साखर कार्ड नोंदवून या वेळेत साखर घेऊन जाण्याचे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात यांनी केले आहे सदर साखर विक्री केंद्रावरून साखर न उचललेल्या सभासदांना कारखाना साइटवर दर शुक्रवारी सकाळी दहा ते पाच या वेळेत साखर उपलब्ध करून दिली जाणार आहे 2024 डिसेंबर पर्यंत साखर देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती प्रभारी कार्यकारी संचालक रमेश भाई यांनी सांगितले.
 कारखान्याचे संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरूकुल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणोकाका पाटील ,भारत बेद्रे ,दयानंद सोनगे, औदुंबर वाढदेकर, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे ,सुरेश कोळेकर व कारखान्याचे सर्व खाते प्रमुख या सर्वांनी नियोजन करून दिवाळीसाठी सभासदांना साखर देण्याचे नियोजन केले आहे साखर वाटप केंद्र कारखाना साईट उचेठान, बठाण ,मुढवी ,मंगळवेढा शहरात नागणेवाडी, खोमनाळ ,फटेवाडी ,अकोला, धर्मगाव ,कचरेवाडी, ब्रह्मपुरी मुंडेवाडी
,माचनूर ,रहाटेवाडी तामदर्डी ,बोराळे, सिद्धापूर ,तांडूर, आरळी ,डोणज ,नंदुर ,मरवडे ,येड्राव, बालाजीनगर , कात्राळ ,कागाष्ट, कर्जाळ, डिकसळ, हुलजंती, पौट सोड्डी, येळगी ,शिवणगी, भोसे ,रेड्डी ,जालीहाळ ,सिद्धनकेरी ,नंदेश्वर, खडकी जुनोनी ,हुन्नूर ,मानेवाडी ,रेवेवाडी लोणार ,पडळकरवाडी ,पाटखळ, डोंगरगाव ,हजापूर ,खूपसंगी, शिरशी ,आंधळगाव, गणेशवाडी, शेलेवाडी ,गुंजेगाव ,लक्ष्मी दहिवडी ,ममदाबाद
शेटफळ, मारापुर ,मल्लेवाडी, घरनिकी, देगाव ,ढवळस, सलगर बुद्रुक, सलगर खुर्द ,आसबेवाडी ,जंगलगी, मारोळी ,निंबोणी, खवे, जित्ती , बावची, तळसंगी, भालेवाडी, हिवरगाव भाळवणी गोणेवाडी शिरनांदगी चिखलगी लेंडवे चिंचाळे लवंगी ममदाबाद हुन्नूर आधी 34 केंद्रावर सभासदांना साखर वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button