Uncategorizedराजकारणसोलापूर जिल्हा

Breakingसोलापूर जिल्ह्यात विधानसभा लढती होणार चुरशीच्या, 11 मतदारसंघात मविआ वि महायुतीचे उमेदवार?

सोलापूर जिल्ह्यात विधानसभा लढती होणार चुरशीच्या, 11 मतदारसंघात मविआ वि महायुतीचे उमेदवार?

साेलापुर विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच तापला आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळं आज अनेकजण इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.दरम्यान, या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. कोणत्या मतदारसंघातून कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार असणार हे जाहीर झालं आहे. जाणून घेऊयात सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या लढतींची माहिती.

सोलापूर जिल्ह्यात घोषित झालेले प्रमुख उमेदवार

1) अक्कलकोट भाजप – सचिन कल्याणशेट्टी

vs

काँग्रेस – सिद्धाराम म्हेत्रे

2) सोलापूर उत्तर

भाजप – विजयकुमार देशमुख

vs

राष्ट्रवादी (शप) – महेश कोठे

3) सोलापूर दक्षिण

भाजप – सुभाष देशमुख

vs

शिवसेना (उबाठा) – अमर पाटील

vs

काँग्रेस – दिलीप माने

4) सोलापूर मध्य

भाजप – देवेंद्र कोठे

Vs

एमआयएम – फारुख शाब्दि

vs

सीपीएम – नरसय्या आडम

vs

काँग्रेस – चेतन नरोटे

5) मोहोळ

राष्ट्रवादी(अप) – यशवंत माने

vs

राष्ट्रवादी (शप) – राजू खरे

6) बार्शी

शिवसेना (उबाठा) – दिलीप सोपल

vs

शिवसेना (शिंदे) – राजेंद्र राऊत

7) माढा

राष्ट्रवादी (शप) – अभिजित पाटील

राष्ट्रवादी (अप) – मीनल साठे

अपक्ष – रणजित शिंदे

8) सांगोला

शिवसेना (शिंदे) – शहाजी बापू पाटील

vs

शिवसेना (उबाठा) – दीपक आबा साळुंखे

vs

शेकाप – बाबासाहेब देशमुख

9) माळशिरस

राष्ट्रवादी (शप) – उत्तम जानकर

vs

भाजप – राम सातपुते

10) करमाळा

राष्ट्रवादी (शरद पवार ) – नारायण आबा पाटील

vs

अपक्ष – संजयमामा शिंदे

vs

शिवसेना (शिंदे) – दिग्विजय बागल

11) पंढरपूर-मंगळवेढा

भाजप – समाधान अवताडे

vs

काँग्रेस – भगीरथ भालके

vs

राष्ट्रवादी (शरद पवार गट ) – अनिल सावंत

आघाडीत बिघाडी, काही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळं या ठिकाणच्या लढती रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पंढरपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर शरद पवा रगटाकडून अनिल सावंत यांनी देखील उमेदवारी देण्यात आली आहे.

त्यामुळं या ठिकाणी आघाडीत बिघाडी झाली आहे. तसेच सोलापूर दक्षिणमध्ये शिवसेना ठाकरे गटानं अमर पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यानंतर काँग्रेसने देखील दिलीप माने यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं सोलापूर दक्षिण मतदारसंघात देखील आघाडीत बिघाडी झाली आहे, त्यामुळं तिथं

तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळं आणकी कोण उमेदवारी भरते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, 4 नोव्हेंबर हा उमेदवार अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर खरं चित्र स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button