राजकारणसोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातली मोठी बातमी!आ बबन दादा शिंदे निवडणुकी तून घेतली माघार, आता नवा चेहरा मैदानात

 

माढा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन शिंदे हे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली. आगामी विधानसभा निवडणुकीत माढा विधानसभेत तेच उमेदवार असतील अशी चर्चा होती. त्यासाठी त्यांनी भेटीगाठीही सुरू केल्या होत्या. शरद पवारांचीही त्यांनी भेट घेतली होती. पण आता त्यांना आपला विचार बदलला आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. बबन शिंदे हे हक्काने निवडून येणारी जागा होती. पण आता त्यांनीच माघार घेतल्याने हा अजित पवारांसाठी मोठा धक्का समजला जात आहे. बबन शिंदे यांनी जरी माघार घेतली असली तरी पुढचा उमेदवार कोण असेल याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे माढ्यामध्ये पुन्हा एकदा नवा ट्वीस्ट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे माढ्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरू आहे. बबन शिंदे यांनी आपले पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. शिवाय लेकासाठी ते मतांचा जोगवा मागतानाही दिसत आहेत. माढा विधानसभा मतदारसंघात 1995 सालापासून सलग सहा वेळा आमदार बबन शिंदे हे विधानसभेत निवडून गेले आहेत. या मतदारसंघात आमदार शिंदे यांचा चांगला जनसंपर्क आहे. शिवाय साखर कारखानदारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न शिंदे करतात.

गेल्या दोन वर्षापासून आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे विधानसभेची तयारी करत आहेत. मात्र संस्थात्मक काही प्रकरणांमुळे रणजितसिंह शिंदे यांना मतदारांपर्यंत आपली प्रतिमा उंचावण्यात तेवढे यश आलेले नाही. त्यामुळे लेकासाठी बबन शिंदेच मैदानात उतरले आहे. त्यांनी मतदार संघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

पंढरपूर तालुक्यातील आढीव येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार बबन शिंदे आले होते. त्या वेळी बोलताना, त्यांनी यंदा आपण निवडणूक लढवू का नाही याबाबत शंका आहे. मात्र रणजित भैय्याला पाच वर्षासाठी एकदा संधी देऊन पहा. असे म्हणत थेट आपण नाही तर मुलगा मैदानात असेल. तोच राष्ट्रवादीचा उमेदवार असेल असे संकेत दिलेत.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button