सोलापूर जिल्हा

अभिजीत पाटलांनी थोपटले दंड !राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माढा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर; हाती घेणार तुतारी

 

गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यासंदर्भात मोठा घोळ निर्माण झाला होता.

यामध्ये विद्यमान आमदार बबनदादा शिंदे, भाजपाचे विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते- पाटील, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, माढा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मीनल साठे यांचे सह अजून काही उमेदवार इच्छुक होते.

पण अखेर खा. शरद पवार यांनी त्यांचे निकटवर्तीय असणारे व माझी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या खास मर्जीतील अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एबी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी दिली आहे.

अभिजीत पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. अगदी झपाटल्यासारखे विविध कार्यक्रम घेत पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला. आणि याचीच पोचपावती म्हणून शरद पवार यांनी अभिजीत पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे. तसेच पंढरपूर तालुक्यातील जवळपास 42 गावांचा माढा विधानसभा मतदारसंघात समावेश आहे.

यामध्ये बहुतांश विठ्ठल कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावे येतात. आणि जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात अभिजीत पाटील यांनी विठ्ठल कारखान्याला दिलेला उसाचा दर चर्चेत आहे. अभिजीत पाटील यांच्या दर्जाहीर करण्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे आणि ही बाब आगामी विधानसभा निवडणुकीच्या फायदेशीर ठरणार असल्याची चर्चा माढा विधानसभा मतदारसंघात होत आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. यामुळे अभिजीत पाटील यांच्या समर्थकांमध्ये जल्लोष होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button