Uncategorizedगुन्हे

काळाचा घाला !बल्कर आणि दुचाकीचा अपघात ,19 वर्षीय तरूणाला चिरडले, घरी जाण्याचे स्वप्न अधुरेच राहिले

काळाचा घाला !बल्कर आणि दुचाकीचा अपघात ,19 वर्षीय तरूणाला चिरडले, घरी जाणे स्वप्न अधुरेच राहिले

सोलापूर  सोलापूर- पुणे बायपास महामार्गावर बल्कर आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात नांदेड जिल्ह्यातील १९ वर्षीय युवकाचा मागील चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार, दि. १३ रोजी दुपारी १२:३० वाजण्याचा सुमारास टेंभुर्णीजवळ घडली.

गणेश सुभास बसवते (वय १९, रा. पुलवळ, ता. कंधार, जि. नांदेड) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मावसभाऊ प्रतिम मोहन नवघरे (वय १८, रा. शिरसी (ख) ता. कंधार) हा जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतिम नवघरे व गणेश बसवते हे दोघे मावस भाऊ दुचाकीने (एम.एच. २६, सी. क्यू. ५७१२) पुण्याहून रविवारी सकाळी ६ वाजता आपल्या नांदेड येथील पुलवळ या मूळ गावी निघाले होते.

मोटारसायकल टेंभुर्णीतील सोलापूर-पुणे महामार्गावर बायपासने करमाळा ब्रीजच्या लोखंडी पुलाजवळ सोलापूरच्या दिशेने जात असताना बल्कर क्रमांक (एम. एच. ४२ बीएफ २४२५) ने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालवणारा गणेश सुभाष बसवते हा बल्करच्या मागील चाकाखाली अडकून जागीच मरण पावला, तर पाठीमागे बसलेला प्रतिम मोहन नवघरे हा बाजूला उडून पडल्याने जखमी झाला असून त्याच्यावर टेंभुर्णीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर मयताचा छातीचा भाग चेंदामेंदा झाला होता. अपघातानंतर स.पो.फौ. संजय पांडेकर, धनाजी माळी, मकबूल तांबोळी, रहिमान मुलाणी, सचिन साळुंखे, सतीश कापरे या टेंभुर्णी पोलिसांच्या वाहतूक पथकाने तातडीने अपघातस्थळी येऊन जखमीला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले व वाहतूक सुरळीत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button